‘शाळा-महाविद्यालयांमध्ये पैशांविषयी चर्चा का केली जात नाही? आई-वडील मुलांना पैशांविषयी काहीच का शिकवत नाहीत? पैशांविषयी जे काही समजतं ते अनेक ठिकाणी ठेचकाळत, धक्के खातच का शिकावं लागतं? या सगळ्या गोष्टी बदलल्याच पाहिजेत. ‘मेक एपिक मनी’ या माझ्या पुस्तकातून तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजतील. मी स्वतः ज्या गोष्टी खूप उशिरा अतिशय मुश्किलीनं शिकलो, त्या सगळ्या गोष्टी या पुस्तकातून लाखो-कोट्यवधी वाचकांना शिकवण्याची माझी इच्छा आहे. ’ – अंकुर वारिकू
मेक एपिक मनी’ मधून देण्यात आलेला संदेश अतिशय स्पष्ट आहे. तुमची पार्श्वभूमी, तुमच्याकडचं अर्धवट ज्ञान, मर्यादित अनुभव, तुमच्याकडे असलेला तज्ज्ञतेचा अभाव – यांपैकी कोणतीही गोष्ट तुम्हाला पैसा कमावण्यापासून रोखू शकत नाही. तुम्हाला हवे तसे जगण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. मग तुम्हाला नेमकं कोण रोखत आहे? फक्त तुमच्या मनात खोलवर रुजलेले तुमचे विचार!
तुमचे विचारच तुम्हाला आर्थिकदृष्ट्या बरबाद करू शकतात किंवा तुमचं जीवन समृद्ध करू शकतात. विचार बदला, सारं काही बदलून जाईल.
या पुस्तकातून तुमच्या विचारांना आव्हान देण्याचा, त्यांना चिथावणी व प्रेरणा देण्याचा आणि नंतर त्यांना बदलण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
Imprint: Penguin Swadesh
Published: Apr/2024
ISBN: 9780143466611
Length : 360 Pages
MRP : ₹299.00